मुंबई | वृत्तसंस्था |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तासभर ही शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.