| कोलाड | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमधील फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अदिती जैन यांच्या नेतृत्वाखाली टिमने तीव्र रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एआरडीएस सारखी गंभीर वैद्यकीय स्थितीने पिडीत 49 वर्षीय महिलेवर यशस्वीरित्या उपचार केले.
रोहा येथील 49 वर्षीय श्रीमती दिलारा यांना अचानक ताप, अंगदुखी आणि थकवा अशी फ्लु सारखी लक्षणे जाणवू लागली. सुरुवातीला त्यांनी बदलत्या वातावरणामुळे आजारपण आल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. घरगुती उपचारांमुळे रुग्ण बरा होईल, अशी आशा होती. परंतु, काही दिवसांतच तिच्या प्रकृतीने गंभीर वळण घेतले. साध्या थकव्यामुळे सुरू झालेली ही समस्या श्वास घेण्यास तीव्र अडचण होण्यापर्यंत वाढली. तिला तिचे दैनंदिन कामही करता येत नव्हते. काही पावले चालल्यावरही दम लागत होता आणि तिच्या छातीत असामान्य घट्टपणा जाणवू लागला. जसजसे दिवस जात होते तसतसे तिला श्वास घेणे कठीण जात होते तिला बोलणेही कठीण होऊ लागले. खूप काळजी वाटल्याने, तिच्या कुटुंबाने तिला रोह्यामधील जवळच्या डॉक्टरांकडे नेले, परंतु औषधे आणि ऑक्सिजन सपोर्ट असूनही, तिची प्रकृती खालावत गेली. जेव्हा तिचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 30 टक्केपर्यंत खाली घसरले, तेव्हा तिला तातडीने नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसंगवधान राखत वेळीच व अचुक उपचार, चोवीस तास तज्ज्ञांचे निरीक्षण करुन टिमने रुग्णाची प्रकृती स्थिर केली आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे.
रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम रुग्णावर यशस्वी उपचार
