सुचिता शेळके यांचे निधन


| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील पुगाव गावातील रहिवासी सुचिता प्रभाकर शेळके (देशमुख) यांचे रविवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांसहित समस्त पुगाव ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पती, मुलगा, दीर, पुतणे, नातवंडे व शेळके (देशमुख) परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार, दि.5 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र कमलेश्‍वर मंदिर पुगाव येथे, तर उत्तरकार्य विधी शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पुगाव येथील निवासस्थानी होणार आहे. यानिमित्ताने सकाळी 10.30 ते 11.30 वाजता सुषमाताई सुभाष देशमुख यांचे प्रवचन होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

Exit mobile version