देशात सुडाचे राजकारण वाढतेय

मुख्यमंत्री ठाकरे यांचा हल्लाबोल,केसीआर समवेत चर्चा
| मुंबई | प्रतिनिधी |
देशात सुडाचं राजकारण वाढतंय, मग देशाला भविष्य काय?,असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव  यांनी रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली.यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी  देशातील राजकारण गढूळ बनत असून  ते शुद्ध करण्यासाठी  आज नवी सुरुवात आम्ही केली आहे. तसंच याला आकार येण्यास काहीसा वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा इशारा देत भाजपला थेट आव्हान  दिले आहे. या बैठकीला राव यांच्यासोबत काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राज   तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते.

देशातील मुलभूत प्रश्‍न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल. – उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री

बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार – केसीआर
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद वाटला. ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत झालं आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितल

गमी साफ करतो की आज एक सुरुवात झाली आहे. आम्ही सर्व सांगितलं आहे. आम्ही देशातील दुसर्‍या नेत्यांशी चर्चा करु. काय अपेक्षित आहे, काय करायला हवं यावर चर्चा होईल – के.चंद्रशेखर राव

शरद पवारांची भेट
 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची भेट घेतल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (घ   यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार  यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे  या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

Exit mobile version