कार्याध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची नियुक्ती
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी सुदाम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून अभिजीत पाटील यांना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्तीपत्र दिले आहेत. सुदाम पाटील अभिजीत पाटील यांचा तळागाळातील जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे आगामी पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सुदाम पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पनवेलमध्ये इंटकचे राष्ट्रीय अधिवेशन व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताहीर पटेल, अमित लोखंडे, शशिकला सिंह, अस्मिता पाटील, हरपिंडर वीर, सुदेशना नारायते, विनीत कांडपिळे, जयश्री खटकाले, शिला घोरपडे, सुनीता माळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. यावेळी सुदाम पाटील यांना काँग्रेसमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन यावेळी नाना पटोले यांनी दिले होते.






