| माणगाव | प्रतिनिधी |
लोणशी, ता. माणगाव येथील रुपेश बा़ळाराम केकाणे (वय 40) यांचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली. रुपेश बाळाराम केकाणे हे वणवा विझविण्यासाठी गेले होते. पण ते घरी परत न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता रुपेश वणव्यापासून जवळच पाण्याच्या ओहळ किनारी बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. तसेच त्याचा डावा पाय भाजलेला दिसला. म्हणून उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणले. याठिकाणी रुपेशला आणल्यावर येथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.