कर्तृत्ववान महिलांचा पालीत सन्मान
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम नुकताच पालीतील पक्ष कार्यालयात राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. पुरस्कार व सन्मानाने प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र घडते, या दृष्टिकोनातून कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.
यावेळी प्रा.अंजली पुराणिक, गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, डॉ.अदिती भिडे, कृषिकन्या रसिका फाटक, आरोग्य विस्तार अधिकारी कामना लोखंडे, शिक्षिका प्रमिला म्हात्रे, पोलीस हवालदार मनीषा लांगी, मुख्याध्यापिका संध्या तुरे, आशा सुपरवायझर लता मोकल व शिक्षिका जयश्री फुंदे या कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मान केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सुलतान बेनसेकर, तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्षा सुजाता वडके, हर्षा चांदोरकर, अस्मिता घरत, अयोध्या शिंदे, सन्मानित महिला व पदाधिकारी उपस्थित होते.