| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पेडली येथील चार दुकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पेडली येथील साई पान शॉप, आप्पा इलेक्ट्रिक हार्डवेअर, मळेकर किराणा स्टोअर व एक मोबाईल शॉपी अशा एकूण चार दुकानांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये आप्पा इलेक्ट्रिक हार्डवेअर दुकानातील अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. यावेळी चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या संदर्भात पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जयस्वाल हे करीत आहेत.







