| सुधागड -पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून वातावरण आणि बरसलेल्या अवेळी पावसामुळे आंबा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुधागड तालुक्यात मोहरानी बहरलेले व काही ठिकाणी कैर्या धरलेले आंबा पीक अवकाळीने पूर्णता धोक्यात आले आहे. यावर्षी आंब्यांना चांगला मोहर आला होता. अवेळी पाऊस यामुळे आंबा बागायतदारांचे फार प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाचा परिणाम आंबा पीकावर झाला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूसची जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवेळी पाऊस, तापमानात वाढ आणि कमीपणा आदीबाबत शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान झाले असून तालुक्यातील झालेल्या नुकसानीची पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे.