| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील गोवठणे गावातील शेकापचे एकनिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर रघुनाथ म्हात्रे यांचे दि. 19 रोजी अल्पशा आजाराने 72 व्या वर्षी निधन झाले. म्हात्रे हे हरहुन्नरी व अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते शिक्षक म्हणून केंद्रप्रमुख या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला असुन गोवठणे पंचक्रोशीतील एक सुपरिचित व्यक्ती म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांच्या दु:खद निधनाने या परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे दहावे दि. 28 रोजी केगाव माणकेश्वर येथे तर उत्तरकार्य 2 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी गोवठणे येथे होईल.