सुधीर चेरकर यांना जामीन मंजूर

| अलिबाग | प्रतिनिधी |

बैलगाडी हाकलण्यावरून मारहाणप्रकरणी सुधीर चेरकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीनंतर पुन्हा त्यांना बुधवारी (दि. 17) रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. रविवारी भेरसे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याची जबाबदारी सुधीर चेरकर यांनी घेतली होती. सायंकाळी बैलगाडी सोडताना ऋषीकेश यांची बैलगाडी रेषेच्या मागून सोडली. त्यामुळे त्यांची बैलगाडी मागेच राहिल्याने शेवटचा नंबर आला. याबाबत ऋषीकेश यांनी विचारणा केली असता सुधीर चेरकर यांनी ऋषीकेश यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 15 जानेवारीला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले होते. दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर बुधवार 17 जानेवारी रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.

Exit mobile version