। महाड । प्रतिनिधी ।
वैश्यवाणी समाज सेवाभावी संस्था महाड-पोलादपूर तालुका अध्यक्षपदी सुधीर मांडवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अनिल ताठरे, नंदकुमार खातु, प्रज्ञा डोळस, नंदकिशोर थरवळ, भूषण देवळेकर, अमर जैतपाळ तर सचिवपदी किरण वायकूळ, सहसचिवपदी राजश्री खेडेकर, खजिनदार संतोष डाकवे यांची व इतर कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.
संस्थेची सर्वसाधारण सभा वैश्यवाणी समाजाच्या हनुमान मंदिर, महाड येथे झाली. सुरुवातीला समाजातील निधन पावलेल्या बंधु-भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुधीर मांडवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिनानाथ महाकाळ यांनी सन – 2014 पासून संस्थेचे उत्तम प्रकारे केल्याबद्दल सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यांच्या आजारपणामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे सभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुधीर मांडवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सभेला संस्थेचे संस्थापक प्रसिद्ध व्यापारी संतोष थरवळ, शहर अध्यक्ष अशोक वारंगे, सुधाकर गांगण, संगिता थरवळ, उदय गांगण, प्रविण डोळस, माजी सभापती संजय चिखले, नवीनचंद्र थरवळ, विनायक वाडकर, समीर पाथरे, नंदकुमार सातपुते, सुभाष खातु, राधेश्वरी थरवळ, राजा शेट्ये, राजेंद्र जैतपाळ, सुवर्णा थरवळ, राहुल थरवळ, अरुण गांगण, सुरेंद्र खातु, सोनाली खातु, सुनिल गांगण, परशुराम जैतपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.