सुधीर पुराणिक यांचे निधन

। पाली । वार्ताहर ।

शहरातील शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, पालीतील शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुधीर पुराणिक यांचे बुधवारी (दि.3) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीला पाली शहरासह सुधागड तालुक्यातील नागरिक, शिक्षक वर्ग, आजी माजी विद्यार्थी, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने पाली शहरावर व पुराणिक कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रा. सुधीर पुराणिक यांना श्रद्धांजली वाहिली.

पुराणिक यांनी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालिवाला महाविद्यालय पाली सुधागडचे भौतिकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून 34 वर्षे काम पाहिले, 2005 सालापासून पालीवाला महाविद्यालयाचे ते उपप्राचार्य होते. 2004 ते 2011 पर्यंत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तर 2012 ते 2014 पर्यंत जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे प्रभारी संचालक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई विद्यापीठमार्फत अनेक समजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. प्राध्यापक सुधीर शरदचंद्र पुराणिक यांची महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे अव्वल दर्जाचे मानांकन असलेल्या मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून काम केले.तसेच कोरोना काळात मदतकार्यें, कम्युनिटी किचन, सुमारे 350 ते 375 हुन अधिक रक्तदान शिबिरे, 25 हजार हुन अधिक रक्तदान युनिट असे विविध उपक्रम पुराणिक सरांनी यशस्वीरित्या राबवली आहेत.

Exit mobile version