| उरण | प्रतिनिधी |
मकरसंक्रांतीला पुजेसाठी लागणारी पारंपारिक मातीची सुगड उरण बाजारात विक्रीसाठी आले असून, महिलावर्गाची ते खरेदी करतांना लगबग दिसू लागली आहे. पुजेसाठी लागणारी सामुग्री व मातीची सुगड आदी वस्तुची दुकानात ठेवण्यात आल्या आहेत. मातीची सुगड बाजारपेठेत ठीक-ठिकाणी विकाव्यास आल्या आहेत. उरण बाजार पेठेत महाराष्ट्र स्वीट जवळ, हरिलाल जनरल स्टोअर्स समोर, राजपाल नाका गांधी चौक, आदी ठिकाणी पुजेचे समान व मातीची सुगड विकावयास आली आहेत. लहान मातीची सुगड 50 रुपयास 5 नग, मोठी 50 रुपयास दोन, 60 रुपयास 2 नग अशा भावाने विकतो असे कुंभारवाडा मुळेखंड येथील सुरेखा मनोहर कुंभार यांनी सांगितले.






