पनवेल । वार्ताहर ।
लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी तसेच कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातुन पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोव्हिडमुळे यामध्ये काही अडथळे येत असले तरी देखील अंगणवाडी सेविका व मदतनीसा मार्फत लाभार्थ्यांपर्यंत विविध खाद्यान्न पोहचविले जात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषक आहारातुन खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे.
पनवेलमध्ये देखील या योजनेचे प्रकल्प अधिकारी चेतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने या योजेनचे उत्तम नियोजन केले जात आहे. 31395 एकूण लाभार्थ्यांना तालुक्यात या योजनेचा लाभ मिळतो. तालुक्यात 79 बचत गटांच्या माध्यमातुन अंगणवाडयांना आहार दिला जात आहे.
कोव्हिड काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.
वैशाली ठाकूर
प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल याकरिता आमचा प्रयत्न असतो. याकरिता अंगणवाडी सेविका व मदतीस हे काम पाहतात. कोव्हिड काळात टेक होम रेशनद्वारे आम्ही लाभार्थ्याला घरपोच सुविधा देईल याकडे लक्ष देत असतो. पनवेलमध्ये पोषक आहार योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
चेतन गायकवाड (प्रकल्प अधिकारी, पनवेल)