| रसायनी | प्रतिनिधी |
ग्रामसेवक सुहास वारे यांनी ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांना सन 2018-19 साठी त्यांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार त्यांना शुक्रवारी दि.17 अलिबाग येथे मंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपकार्यकारी अधिकारी ग्रा.पंचायत स्तर विशाल तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यामुळे वारे यांचे रायगड जिल्ह्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी व सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुहास वारे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
