। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्याती आरवली येथील 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडलेली आहे. आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव चंद्रकांत श्रीपाद गुरव असे असून यांनी आरवली गुरववाडी येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. चंद्रकांत यांना दारूचे व्यसन होते. त्यांनी शनिवारी (दि.27) राहत्या घरी सिलिंग फॅनला नायलॉनच्या साडीने गळफा घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.