। महाड । प्रतिनिधी ।
एका वीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.4) रात्री 7.30 ते 8.15 वाजण्याच्या दरम्यान चांभारखिंड येथे घडली.
या घटनेची माहिती भावना सुनील महाडिक (40, रा. चांभारखिंड-महाड) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. जागृती सुनील महाडिक (20, रा.चांभारखिंड-महाड) असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
महाड शहर पेालीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागृतीने 4 ऑगस्ट रोजी कोणत्यातरी अज्ञात कारणाने स्वतःच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार श्री. पवार हे अधिक तपास करीत आहेत.
20 वर्षीय तरुणीची आत्महत्या
