। सातारा । प्रतिनिधी ।
भूषणगड (ता. खटाव) येथील पंतवस्तीत राहणार्या विवाहितेने तीन वर्षांच्या चिमुकलीसह गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजता घराच्या पाठीमागील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सीमा रवींद्र येवले (30) व तन्वी रवींद्र येवले (3) असे विवाहिता व चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पती रवींद्र रामहरी येवले यांनी औंध पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.