| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यातील तळेगाव येथील तनु उर्फ दीक्षीता गजानन तलार (20) या मुलीने कोणत्यातरी अज्ञात कारणाने किंवा नैराश्याच्या पोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार (दि.15) रोजी दुपारी पावणे दोन वाजता घडली. सदर घटना समजताच तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे पोलीस हवालदार जगधने यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष जागेवरती पाहणी करून पंचनामा केला. या घटनेच्या आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहा.पो.निरीक्षक शिवराज खराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह.जगधने करीत आहेत