खारघरमध्ये तरुणीची आत्महत्या

| पनवेल | वार्ताहर |

प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका 18 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. दरम्यान, त्याच भागात राहणार्‍या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. याच तणावातून तिने दुसर्‍या दिवशी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तरुणीच्या बहिणीने खारघर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

Exit mobile version