| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील कोटेश्वरी तळे विभागात राहणार्या तरुणाने शहरातील दस्तुरी नाका परिसरात एका झाडाच्या फांदीला नायलॉनच्या रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम अरुण कदम (25) असे या तरुणाचे नाव असून, सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील दस्तुरी नाका परिसरातील पटेल बिल्डिंग आवारात असणार्या एका झाडाच्या फांदीला नायलॉनच्या रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






