। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद उर्फ नाना टेंबे यांच्या पत्नी सुजाता टेंबे यांचे शनिवारी (दि.11) वयाच्या 65व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीसह तालुक्यातून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोमवारी (दि.20) तर अंतिम धार्मिकविधी विधी गुरूवारी (दि.23) त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.