| रेवदंडा | महेंद्र खैरे |
सुके कोंळबी सोडे, मच्छी मार्केेटला खवय्यांची मोठी मागणी असते. नित्याने पर्यटक, पै-पाहूणे, मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमनी यांची सुकी मच्छी विक्रेत्यांकडे सुके सोडे खरेदीची मागणी असते. सुके कोळंबी सोडे विक्रीचा दर किलोस 1200 ते 1500/- रूपये असा गगणाला भिडल्याने सुके कोंळबी सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतासाठीच…! असे म्हणायची वेळ आली आहे.
सुके कोंळबी सोडे रस्सा सर्वाच्या खवय्याच्या खास आवडीचा. तिखट झणझणीत बटाट घालून सुके कोंळबी सोडे रस्सा जेवताना चार घास जास्त पोटात घालावयास लावतो. स्थानिकांसह पर्यटक, पै-पाहूणे, मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमनी सुके कोंळबी सोडे यांची सुकी मच्छी विक्रेत्यांकडे खरेदीला झुंबड असते. मोठी कोंळबी सुकवून त्यांचे सोडे बनवून कोळी बांधव-भगिनी विक्रीस ठेवतात, सुके कोंळबी सोडे चांगला भाव मिळवून देत असल्याने थोडेसे अधिक कष्ट घेत जास्त रक्कम वसूली सुके कोंळबी सोडे देतात. त्यामुळे मोठी कोंळबी मिळाली की, सुके कोंळबी सोडे बनविण्यावर कोळी समाज भगिनी-बांधव अधिक लक्ष केंद्रीत करतात.
सुके कोंळबी सोडे विक्रीचा दर किलोस 1200 ते 1500/ रूपये असा झाल्याने सुके कोंळबी सोडे आता फक्त श्रीमंतासाठीच… असे म्हणणाची वेळ आली आहे. तरीही सुके कोंळबी सोडे खरेदीची मागणी मोठी असल्याचे आग्राव, थेरोंडा, कोर्लई, येथील प्रसिध्द मच्छी खरेदी विक्रीते व सुकी मच्छी व्यावसायिक यांनी सांगितले.