। उरण । वार्ताहर ।
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे दिनांक 12 ते 21 मे दरम्यान चालू असलेल्या फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर द्रोणागिरी स्पोर्ट्स अकादमीचे संस्थापक महादेव घरत ह्यांचा हस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन संपन्न झाले. फुटबॉल खेळाचे विविध प्रकारचे कौशल्य, फिटनेस, व्यायाम हे सर्व काही मुलांनी छान प्रकारे आत्मसात केले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व सचिन निकम ह्यांचा पूर्ण वेळ मार्गदर्शन शिबिरात वेगवेगळे उपक्रम राबविले. येणार्या काळातही अजूनही चांगल्या प्रकारे शिबीर विद्यार्थ्यांसाठी घेतले जातील. फुटबॉल खेळा बद्दल जागरूकता व आपल्या हेल्थ आणि फिटनेसकडे लक्ष केंदित करून जीवन खुशहाल करणे, समाजात वाढत असलेल्या वाईट गोष्टींचा र्हास करणे व मैदानी खेळाकडे वळणे हेच ह्या शिबिराचे उद्देश होता असे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे व नंदिनी तोगरे ह्यांनी सांगितले







