। पनवेल । वार्ताहर ।
दिशा कल्चरल इव्हेंट्स प्रस्तुत दिशा महिला मंच व आरके ग्रुप आयोजित नवदुर्गा पुरस्कार व सन मराठी प्रस्तुत सोहळा सख्यांचा कार्यक्रम खांदा कॉलनी येथील बेलेझ्झा बँक्वेट हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आशिष पवार व आरके ग्रुपचे राजेंद्र कोलकर उपस्थित होते. यावेळी करुणा ढोरे, डॉ. श्वेता भालेराव, शांती झा, दिपाली पारसकर, डॉ. शिल्पा भंडारवार, गौरी पाटील, डॉ. विशालाक्षी कानगुले, आशा पाटील, वर्षा पाचभाई या नवदुर्गांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आशिष पवार यांनी मनोरंजनाचे खेळ घेऊन हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी ओरोस्माईल डेंटल क्लीनिकचे डॉ. शिल्पा भंडारवार व अमित भंडारवार यांचे विशेष सहकार्य मिळाले.
सन मराठी प्रस्तुत सोहळा
