सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड

। मुंबई । प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (दि.31) दुपारी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये एकमताने हा ठराव मान्य करण्यात असून विधिमंडळातील सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांचा सायंकाळी उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

Exit mobile version