सुनिल नारायणने निवृत्ती मागे घ्यावी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

फलंदाजांना आकलन न होणारी शैली आणि स्वतः शतक करण्याची क्षमता अशी गुणवत्ता असलेल्या सुनील नारायणला आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेण्यासाठी त्यांचा कर्णधार रोवमन पॉवेल सर्व प्रयत्न करत आहे; पण नारायण काही दाद लागू देत नाही.

आयपीएलमध्ये कोलकता संघाचा सर्वात हुकमी खेळाडू ठरत असलेल्या नारायणने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सलामीला खेळताना शतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीत 4-0-30-2 अशी कामगिरी केली. कोलकता संघाकडून त्याला यंदाही सलामीला पाठवण्यात येत आहे आणि त्यात तो यशस्वी होत आहे. खरे तर वेस्ट इंडीज संघातून कधीच बाहेर गेलेल्या नारायणने आंतरराष्ट्रीय निवृत्ती स्वीकारली आहे; पण जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होत असलेल्या ट्वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी नारायण वेस्ट इंडीज संघात असावा, यासाठी कर्णधार पॉवेल प्रयत्न करत आहे. मंगळवारी कोलकता आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात नारायण आणि पॉवेल आमनेसामने झाले होते.

नारायणशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; परंतु त्याने सर्वांना ब्लॉक केले आहे. अशी खंत पॉवेलने उघडपणे बोलून दाखवली.

Exit mobile version