| शारजाह | वृत्तसंस्था |
अबु धाबी नाइट रायडर्स विरुद्ध शाहजाह वॉरियर्स यांच्यातल्या टी-20 लीगमधील कमालीचा उत्कंठावर्धक ठरला. यावेळी लाएम लिव्हिंगस्टोनच्या आक्रमक फटकेबाजीने मैदान दणाणून सोडले होते. तसेच, सुनील नरीनच्या भीम पराक्रमाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. या सामन्यात लिव्हिंगस्टोनने एका षटकात 33 धावा चोपून काढल्या. त्यात पाच षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर नाइट रायडर्सने 39 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या नाइट रायडर्सने 4 बाद 233 धावा कुटल्या. मिचेल पेरर (15) व ॲलेक्स हेल्स (32) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर अलिशान शराफू (34) याने चांगला खेळ केला. त्यानंतर लिव्हिंगस्टोन व शेर्फाने रुथऱफोर्ड या दोघांनी 97 धावांची भागीदारी केली. परंतु, रुथरफोर्ड 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेलने 4 चेंडूंत 11 धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोनने 82 धावांची नाबाद खेळी केली. त्यात 2 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. यापैकी 32 धावा या एका षटकात आला. त्याने 6,2,6,6,6,6 अशी फटकेबाजी केली. एक चेंडू वाईड ठरल्याने या षटकात 33 धावा आल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वॉरियर्सना 9 बाद 194 धावांपर्यंत पोहोचता आले. टीम डेव्हिडने 60 धावा केल्या; तर, ड्वेन प्रेटोरियसने 39 धावा केल्या. आदिल राशिदने 25 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना 39 धावांनी सामना गमवावा लागला. दरम्यान, रायडर्सच्या सुनील नरीनने 1 बळी घेत विक्रमाला गवसणी घातली. त्याने टी-20 कारकिर्दीत 600 बळींचा टप्पा गाठला आहे. तो वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि अफगाणिस्तानचा स्टार रशीद खान यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे.







