उसरोलीत शेकापच्या सुनिता मांदाडकर विजयी

|  कोर्लई। वार्ताहर।
मुरुड तालुक्यातील  उसरोली ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या सुनीता संतोष मांदाडकर या मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेल्या आहेत. मजगाव ग्रामपंचायत  शिवसेनेचे अभिनय कोळी यांना 456 मते मिळाली तर जना वाघमारे यांना 288 मते मिळाली.
मुरुड तालुक्यात आठ ग्रामपंचायती मध्ये पोट निवडणूक संपन्न झाल्या आहेत. यामध्ये सावली,चोरढे व राजपुरी या ग्रामपंचायत मध्ये कोणताही अर्ज दाखल न झाल्यामुळे येथे निवडणूक होऊ शकलेली नाही. तर एकदरा, कोर्लई व मजगाव या ग्रामपंचायती मध्ये एक एक सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. कोर्लई मध्ये जना कृष्णा वाघमारे एकदरा मध्ये मंगल झुजे, वावडुंगी ग्रामपंचायत मध्ये गोविंद अदावडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
मजगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग दोन मधून वर्षा योगेंद्र गोयजी या सुद्धा बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती मुरुड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी दिली आहे.

Exit mobile version