बांगलादेशच्या ‘सुपर फॅन’ला कानपूरमध्ये मारहाण

| कानपूर | वृत्तसंस्था |

भारत आणि बांगलादेशच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यासाठी पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था आहे. बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारामुळे भारतीयांमध्ये राग आहे. यामुळे बांगलादेशविरोधात भारतीय संघाचे सामने खेळले जाऊ नये, अशी मागणी केली जात आहे. याचदरम्यान, कानपूरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या सुपरफॅनवर स्टेडियममध्येच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

कानपूरमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे चाहते आपापसात भिडले. या झटापटीत बांगलादेशचा सुपरफॅन टायगर रॉबी जखमी झाला आहे. त्यानतंर तातडीने टायबर रॉबीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकदरम्यान ही घटना घडली आहे. या सुपरफॅनने अंगावर टायगरचे चित्र काढले आहे. बांगलादेशचा सुपरफॅन त्याच्या संघाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आला होता.

रॉबीने सांगितलं की, ‘काही लोकांनी माझ्या पाठ आणि पोटावर मारहाण केली. मला श्वास घ्यायलाही जड जात आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हल्ला केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. रॉबीने मारहाण केल्याचा दावा केल्यानंतर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. रॉबीला मारहाण केल्यानंतर त्याला धड बोलायलाही जमेना. त्याला काही जणांनी उचलून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Exit mobile version