‘वाईन’साठी सुपर मार्केट खुले

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीने राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार एक हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. वाईन महागणार सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लीटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळे हा आकडा एक हजार कोटी लीटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रतिलीटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चालना छोटे शॉप्स निर्माण करून त्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या फलोत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.

Exit mobile version