| दिघी | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील बालकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने बोर्लीपंचतन येथे ‘बालरुग्ण सुपर स्पेशालिस्ट आरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. डॉ. राजेश पाचरकर मित्र फाऊंडेशनच्या पुढाकाराने रविवारी (दि.22) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र-बोर्लीपंचतन येथे हे शिबीर होणार आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, माणगाव, महाड आणि अलिबाग येथील तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी होणार असून बालरोग, अस्थिरोग, सर्जिकल, नेत्ररोग व न्यूरोलॉजी या क्षेत्रातील तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागात अनेक बालकांमध्ये जन्मजात विकार, हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार, मेंदूशी संबंधित समस्या आढळून येतात. मात्र, वेळेवर निदान न झाल्याने पुढे गुंतागुंत वाढते. अनेक पालक आर्थिक कारणांमुळे शहरात उपचारासाठी जाऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे. शिबिरात फिमोसिस, हर्निया, अंडकोष न उतरणे, हायपोस्पॅडियस, लिम्फ नोड, लिपोमा, सिस्ट इत्यादी सर्जिकल समस्यांवर सल्ला दिला जाणार आहे. तसेच, भेंगडेपणा, लेझी आय, मोतीबिंदू, नंबर तपासणी अशा डोळ्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. ऑटिझम, एडीएचडी, अपस्मार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, विकासातील विलंब यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांवर तज्ज्ञ मार्गदर्शन होणार आह






