। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वडखळ येथे साजरा होत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाची राज्यात दखल घेतली जात असल्याने समारंभस्थळाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्वतः रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील यांच्यासोबत चर्चा करुन वर्धापन दिनाच्या तयारीची माहिती घेतली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरि ओम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशूराम पाटील, शेकाप तालुका चिटणीस संजय डंगर, स्थानिक वडखळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर आदी उपस्थित होते.