। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीची सायरस पूनावाला इंग्लिश मिडियम स्कूल नागाव येथे प्रभाविष्कार 2024 सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी कलाविष्कारचे सादरीकरण केले.
या सोहळ्याचे उद्घाटन नागाव ग्रामपंचायतच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सरपंच निखिल मयेकर, माजी सरपंच निता मयेकर, फॅशन कोरीओग्राफर जयेश पाटील, फॅशन डिझायनर लक्ष्मी मुकादम, कलाकार ज्योती राऊळ, डॉ. मकरंद आठवले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सरदेसाई, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, अॅकॅडमिक डायरेक्टर श्रुती सुतार, राजश्री पाटील, मुख्य कार्यालयाचे अधिकारी हिरेन राठोड, अंकित भानुशाली, मनिषा रेलकर, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, रूपेश पाटील, मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले इतर मान्यवर पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय विविध गुणदर्शन सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच सुपरमॉम डुपरकिड्स ही नवीन संकल्पना राबविण्यात आली, यामध्ये आई आणि मुलांनी डान्स आणि फॅशन शो माध्यमातून चांगला परफॉर्मन्स केला आणि सर्वांची दाद मिळवली. आई आणि मुल यातील गोड नात्याला संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन कोरीओग्राफर जयेश पाटील यांनी थिम तयार करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. गुलाबी थंडी असून सुद्धा पालक आणि प्रेक्षकांनी कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच 2024 या वर्षामध्ये क्रिडा स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विजय संपादन केला त्या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच शाळेतील सर्वोत्तम क्रिडापट्टू विराज घोलटकर आणि या वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी प्रथम सुनील कर्णेकर तसेच सुपरमॉम डुपरकिड्समधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.