शेकापला पाठिंबा! दुबईतून मतदार आले अलिबागला

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवारी (दि.2)  मतदान प्रक्रिया पार पडली. अलिबागमध्ये संध्याकाळपर्यंत एकूण 70.32% मतदान झाले. यावेळी 11 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 5 हजार 637 महिला व 5 हजार 861 पुरुष मतदारांनी मतदान केले. दरम्यान, अलिबाग मधील एक मुस्लिम कुटुंबिय दुबईमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहत आहेत. अलिबागमध्ये मतदान असल्याची माहिती या कुटुंबाला मिळताच ते शेकापला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी खास अलिबागमध्ये दाखल झाले आणि या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

Exit mobile version