कोळी समाज आंदोलनाला रायगड मच्छिमार संघाचा पाठिंबा


| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

आदिवासी कोळी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्क तथा कोळी समाजाच्या इतर मागण्यांसाठी 23 जानेवारीपासून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्यव्यापी महाआंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रायगड जिल्हा मच्छिमार संघाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मंगळवारी रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मनोहर बैले आणि पदाधिकार्‍यांनी अलिबाग येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन जिल्हा मच्छिमार संघाकडून आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे.

Exit mobile version