। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची बनली आहे. कर्जत मतदारसंघातील भारतीय बहुजन आघाडी आणि अखिल भारतीय मातंग समाज संघटनेच्यावतीने महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसे पत्र अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडी यांनी नितीन सावंत यांना दिले आहे.
कर्जत मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची ताकद दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. पुढील काळात आपण टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन नितीन सावंत यांनी सर्व अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीला दिला आहे. यावेळी अखिल भारतीय मातंग संघ रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. प्रल्हाद बट्टेवार, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जामगीर, तालुका उपाध्यक्ष दिलीप मोहिते, खोपोली शहर अध्यक्ष दिनकर मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू आयवळे, सर चिटणीस भीमराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत सूर्यवंशी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.