| पाताळगंगा | वार्ताहर |
मावळ लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना सर्वसामान्यांकडून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून त्यांना विविध संघटनांनी ही पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत असताना महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेने संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्या आशयाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने संजोग वाघेरे यांना शिलफाटा येथील बैठकीत देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे प्रवक्ते नसीम सिद्दिकी, ज्येष्ठ नेते सिराज मेहंदी, सुलतान मालदार, शिराज शेख, साजिद खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष इस्माईल युनूस दिवाणी, उपाध्यक्ष शहाबाज लोगडे, कादिर उस्मान खेसे, महिला रायगड जिल्हा अध्यक्ष शबाना मुजम्मिल मुल्ला, ग्रामीण रायगड जिल्हा अध्यक्ष रिजाय नजीर काजले, तालुका कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनाथ पिंगळे, संतोष देशमुख, पंकज रुपवते, विलास चालके, संघटक दिलीप पुरी आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता.