। पेण । वार्ताहर ।
विधानसभेच्या निवडणुकीची रणधूमाळी सुरु असताना रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापच्या चारही उमेदवारांना रायगड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्र शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.
यात पेण-पाली मतदार संघाचे उमेदवार अतुल म्हात्रे, अलिबाग-मुरुड-रोहा मतदार संघांच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई, पनवेल मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील व उरण मतदार संघाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहिर पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. अशी माहिती कर्मचारी महासंघांचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील यांनी दिली आहे. यावेळी, अरुण पाटील यांनी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.