। रसायनी । वार्ताहर ।
मावळ लोकसभा मतदारसंघातून घरोबा करणार्या विद्यमान खासदारांना संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा पाठिंबा घाम फोडत आहे. संविधानिक मार्गाने संजोग वाघेरे पाटील यांचा पाडाव करणे अशक्य वाटू लागल्याने विद्यमान खासदाराने रडीचा डाव खेळण्यास प्रारंभ केला आहे.
याबाबत एकंदरीत जनतेतील प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला असता बहुतांश नागरिकांचे असे म्हणणे आहे की, जर विद्यमान खासदारांनी गेल्या दहा वर्षात प्रामाणिकपणे काम करत जनसेवा करायला हवी होती. ज्या पद्धतीने अहवालांची कागदे रंगवण्याचे काम विद्यमान खासदारांकडून होत आहे. एकंदरीतच सत्ता परिवर्तनाचे संकेत मिळू लागल्यामुळे विद्यमान खासदारांनी रडीचा डाव खेळला असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सर्वच स्तरांतून उमटत आहे. गेल्या दहा वर्षात स्वतः केलेल्या कामांच्या जोरावरती निवडून येणे अशक्य वाटत असल्यामुळे विद्यमान खासदारांनी साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरणे सुरू केल्याची चर्चा मावळ लोकसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.