नारी शक्तीला पाठबळ

तीन नव्या योजना सुरु करणार
2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. महिला सबलीकरणासाठी बजेटमध्ये तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य आणि सक्षम आंगणवाडी आणि पोषण 2.0 सारख्या योजनांना व्यापक रुप देणार. तसेच देशातील 2 लाख आंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडीच्या रुपात अपग्रेड केल्या जाणार आहेत. महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंगणवाड्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी अंगणवाड्यांचा दर्जा सुधारला जाईल.
महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी दोन लाख अंगणवाड्या आणखी उत्तम केल्या जाणार आहेत. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी राष्ट्रीय टेलि मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला जाईल. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल. याद्वारे डिजिटल रजिस्ट्री, युनिक हेल्थ आयडेंटिटी आणि आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस दिला जाईल. इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल. हमी कवच 50,000 कोटी रुपयांवरून एकूण 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविला जाईल. या माध्यमातून हेल्थ प्रोव्हायडर्ससाठी डिजिटल रजिस्ट्रीज, युनिक हेल्थ आयडेंटिटी आणि आरोग्य सेवा मिळवण्यासाठी युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस मिळवता येईल.

Exit mobile version