वणव्यामुळे सुप्रीम कंपनीला आग

| पाली/बेणसे | वार्ताहर |

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील सुप्रीम कंपनीत वणव्यामुळे भीषण आग लागली होती. या आगीमध्ये सुप्रीम कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुपारच्या कडक उन्हात ही भीषण आग लागल्याने ती आग विझवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तात्काळ रोहा येथील सुप्रीम कंपनीला कळवून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावून आग विझवण्यात आली.

वारंवार लागणार्‍या वणव्यांमुळे समतेचे नुकसान तर होतच आहे त्याचबरोबर वनसंपदा व पशु पक्षांची होरपळ होत आहे. आणि बहुतांश वणवे हे मानवनिर्मित लावले जात आहेत. वणव्यामुळे लागलेल्या आगेची ही दुसरी घटना असून फेब्रुवारी महिन्यात पाली खोपोली राज्य महामार्गावर दापोडे गावाजवळील मांढरे पेट्रोल पंपा समोर भंगार व जुन्या लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली होती. ही आग वणव्यामुळे लागली होती. या आगीत दोन्ही गोदामातील सामान व गोदाम बाहेर उभी असलेली तीनचाकी वाहन जळून खाक झाले होते.

Exit mobile version