। बारामती । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. बारामतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या होत्या. या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय लढत असून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुळे आघाडीवर असल्याचे बघायला मिळाले. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला असून बारामतीत सुप्रिया सुळें विजयी झाल्या आहेत.





