| पुणे | वृत्तसंस्था |
सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसला ‘किती बी येऊ द्या त्यांना एकटा बास’ हे गाणं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर ठेवलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर विविध पोस्टचा पाऊस पडत आहे. राज्यातील हाय व्होल्टेज लढत म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष आहे. सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे आता स्पष्ट झाले असून, दोन्ही बाजूंकडून प्रचाराला प्रारंभही झाला आहे. सुप्रिया सुळे या टेक्नोसॅव्ही म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या स्टेटस, फेसबुकच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे.
कितीही आले तरी त्यांना एकटे शरद पवार पुरेसे आहेत, असाच याचा अर्थ असून राजकीय मुत्सद्देगिरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हेच सगळ्यांना पुरून उरतील असाच संदेश या स्टेटस द्वारे सुप्रिया सुळे यांनी पोहोचविला आहे.
सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत
