चौलमधून चिऊताईंना मताधिक्य देणार- सुरेंद्र म्हात्रे

शितळादेवीला नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ


| चौल | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांना चौल विभागातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देणार असल्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला. गद्दाराला मातीत गाडण्यासाठी सर्वांनी एकदिलाने हातात हात घालून काम करावे, असे आवाहन म्हात्रे यांनी केले. चौल विभागाचे आराध्य दैवत शिताळादेवीला नारळ वाढवून चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (दि. 10) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सुरेंद्र म्हात्रे पुढे म्हणाले की, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई या उच्चशिक्षित उमेदवार असून, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. महाविकास आघाडीला चांगला उमेदवार लाभला असून, आपण सर्वांनी एक होऊन त्यांना चौल विभागातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या उमेदवाराची निशाणी शिट्टी असून, ही शिट्टी घराघरात पोहोचवा, असेही त्यांनी सांगितले. प्रचाराला अवघे आठ दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करुन मतदारांपर्यंत पोहोचून आपण केलेल्या विकासकामांची आठवण करुन द्या. तसेच पुढील काळात आपण काय करणार आहोत, याबाबतही मतदारांना समजावून सांगा. चौल विभागातील मतदार सुज्ञ असल्याचेही सुरेंद्र म्हात्रे म्हणाले.

1 / 12

दरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, रविवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. ग्रामस्थांना प्रचार पत्रके देत 20 नोव्हेंबरला शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना मतदारन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झंझावाताने विरोधक पुरते हतबल झाले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. गद्दारांना मातीत गाडण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने चौल विभागात प्रचाराचा झंझावात सुरू आहे.

यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, चौल ग्रा.पं.चे माजी सरपंच मधुकर फुंडे, माजी सरपंच रुपाली म्हात्रे, शेकाप विभाग प्रमुख अरविंद शिवलकर, माजी उपसरपंच अजित गुरव, सदस्य निलेश नाईक, मधुकर काटकर, शिवसेना विभाग प्रमुख मारुती भगत, राजेंद्र ठाकूर, विजय ठाकूर, रमेश म्हात्रे, हेमंत पाटील, प्रशांत वर्तक, आशिष पाटील, राहुल नाईक, शैलेश नाईक, महेंद्र नाईक, महेश पाटील, प्रशांत जाधव, राजेंद्र गुरव, कैलास वरसोलकर, प्रदीप भट्टीकर, नूतन माळी, क्रांती जाधव, ग्रा.पं. सदस्य कल्याणी बाजी, अनिल तुरे, रमेश नाईक, केदार मळेकर, वंदेश तेलंगे, अमित फुंडे, अमर फुंडे, विनोद ठाकूर, संजय पिटनाईक, गोरख डोयले, राजू डोयले, कुंदन भगत चौल विभागातील ग्रामस्थ, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version