| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील प्रसिद्ध कापड व्यापारी, जैन समाज अध्यक्ष सुरेश भूरमल जैन यांचे शनिवारी (दि.23)अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 61 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, चार भहिणी, जावई, सुन, नातवंड आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जैन आणि सामजिक मित्र परिवाराचे मोठे नुकसान होऊन कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची मनोभावना समीर बनकर, सुरेश कुडेकर, संजय खांबेटे, अशोक काते, ओसवाल, जैन यांनी श्रद्धांजली वाहिली. सोमवारी (दि.25) दुपारी दोन वाजता म्हसळा हिंदु स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.