। म्हसळस । वार्ताहर ।
म्हसळा शहर हिंदू समाजाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश काशिनाथ उर्फ बाबा करडे यांचे मंगळवारी (दि.21) वयाचे 81 व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांनी अनेक वर्ष हिंदू समाजाचे अध्यक्ष पद भूषविले. हिंदू समाजाची श्री धावीर यात्रा व विविध उत्सव साजरे करण्यात ते नेहमी अग्रेसर असत. त्यांना 2019 साली आदर्श बागायतदार म्हणून प्रेस क्लब म्हसळाने गौरविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.