दरडग्रस्त भागांची प्रशासनाकडून टेहळणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दि.20 जुलै 2022 रोजी पोलादपूर तालुक्यातील मौजे कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट दिली.

यावेळी त्यांनी दरडप्रवण भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या कालावधीत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच दरडीची लक्षणे ओळखणे, आपत्ती येण्यापूर्वी सतर्क राहणे, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट याबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितलेल्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात अशा संबंधित कर्मचार्‍यांना महाड प्रांताधिकारी श्रीमती पुदलवाड यांनी सूचना दिल्या. या पाहणी दौर्‍यावेळी पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई, मंडळ अधिकारी, तलाठी, संपर्क अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version