पनवेलमधील नद्यांचे होणार सर्वेक्षण

पूररेषा निश्‍चितीचा निर्णय
मनपा सभेत जोरदार पडसाद

| पनवेल | प्रतिनिधी |

दरवर्षी अतिवृष्टीमुळे पनवेल पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. यामुळे पालिकेने परिसरातील नद्यांचे सर्वेक्षण करून तेथील पूर नियंत्रण रेषा कायम करण्याचा प्रस्ताव ा सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. रायगडच्या पाटबंधारे विभागाला एक कोटी 18 लाख रुपयांचा खर्चाच्या प्रस्ताव मंजुरीसाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवण्यात आला. मात्र यामध्ये गाढी व पाताळगंगा नद्यांच्या पूररेषेचे सर्वेक्षण होणार असल्याने शेकापचे पालिका सदस्य अरिवद म्हात्रे यांनी कासाडी नदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच सिडको वसाहतीमधील मुख्य नाल्यांचे पूररेषा सर्वेक्षण करून तेथे दिशादर्शक प्रसिद्ध करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका सदस्य सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

या सर्वेक्षणावर निवेदन करताना भाजपचे पालिका सदस्य अजय बहिरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे नमो गंगे या योजनेअंतर्गत तक्का गावातील नदीपात्रात गणेश घाटावर पाच वर्षांपूर्वी स्वच्छ करण्याच्या योजनेचा शुभारंभ झाला. मात्र तेथे सध्या सिडको मंडळाच्या उदंचन केंद्रातील पाणी सोडून नदीपात्र दूषित केले जात असल्याकडे सदस्य बहिरा यांना लक्ष वेधले. नदीपात्रालगतच्या इमारतींचा मल थेट या नदीच्या पाण्यात सोडला जात असल्याने तहसीलदारांना निवेदन देऊनही यावर कार्यवाही होत नसल्याची खंत सदस्य बहिरा यांनी व्यक्त केली.

विमानतळाच्या निमित्ताने केलेला भराव, करंजाडे नोड वसविताना आणि बंदररोडच्या खाडीपात्रालगत झालेला भराव यामुळे पनवेलची भौगोलिक स्थिती बदलली आहे. सिडको मंडळाने घाईघाईने व बेजबाबदार पद्धतीने केलेल्या भरावामुळे ही स्थिती पनवेलवर ओढवली आहे. पर्यावरण अहवाल दडवल्याने पनवेलकरांना याचे नुकसान भोगावे लागत आहे. याच चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पूर्वीच्या तुलनेत सध्याची पूररेषा यामध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. यामुळे पूररेषा पनवेल शहराच्या आतल्या बाजूला आली आहे. तसेच बांधकामांवरती मोठया प्रमाणात बंधणे येणार आहे. जोपर्यंत या सर्व रेषांचे सीमांकन ठरत नाही तोपर्यंत पालिकेचा प्रारूप विकास आराखडा पूर्ण बनवता येणार नाही.

Exit mobile version